स्त्रियांचा मुळव्याध Piles in Women – Know Symptoms

 स्त्रियांचा मुळव्याध

शौचाची जागा म्हणजे एक अशी जागा, जिथे त्रास झाल्यास लोकांना सांगताना लाज वाटते, खास करून स्त्रियांना. दवाखान्यात गेल्यावर, पुरुष डॉक्टर असल्यास काही स्त्रिया तपासणीसाठी तयार होत नाहीत. परंतु, त्रास असूनही लाजेमुळे सहन करणे योग्य नाही. या त्रासामुळे वेळेत योग्य उपचार न घेतल्यास आजार वाढू शकतो आणि तो गंभीर होऊ शकतो. त्यामुळे, सर्वांनी, स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही, शौचाच्या ठिकाणी काही समस्या असल्यानंतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  असा त्रास अंगावर काढू नये.

 लक्षणे : 

1. शौचाच्या ठिकाणी आग होणे

2. रक्त पडणे 

3. ठणक लागणे 

4. सूज किंवा कोंब हाताला लागणे 

5. शौचाच्या वेळी काही भाग बाहेर येणे , तो पुन्हा आत ढकलावा लागणे किंवा तो बाहेर आलेला भाग तसाच बाहेर राहणे.

       स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात मलबद्धता फिशर व मूळव्याध होण्याचा धोका असतो. 

 

कारणे :

1. स्त्रिया घरच्या कामांमध्ये इतक्या व्यस्त असतात की शौचाचा वेग येऊनही ते शौचाला जात नाहीत. यामुळे मल शुष्क होतो आणि मलबद्धता होते. शुष्क मल बाहेर काढण्यासाठी जोर लावावा लागतो, ज्यामुळे फिशर किंवा मुळव्याध सारखे आजार उद्भवू शकतात. म्हणून, योग्य वेळी शौचाला जाणे आवश्यक आहे.

2. स्त्रियांमध्ये मुळव्याध किंवा फिशर होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गर्भधारणेची अवस्था. गर्भावस्थेत अनेक मल्टीविटॅमिन गोळ्या घेतल्या जातात, ज्यामुळे मलबद्धता होते.

3. बाळ गर्भात वाढत असताना त्याचा दाब पोटावर येतो, ज्यामुळे पोट साफ होत नाही. त्यामुळे शौचाला जोर लावावा लागतो, आणि त्यामुळे ताण येऊन शौचाच्या जागेत जखम होते, ज्याला फिशर म्हणतात.

4. प्रसवाच्या वेळेस, योनी भागासोबतच शौचाच्या जागेवरही ताण येतो आणि ती जागा फाटते, ज्यामुळे जखम होते, म्हणजेच फिशर होते.

5. स्त्रियांमध्ये बसून काम करणे आणि दुपारी झोपणे यामुळे स्थूलता येते, ज्यामुळे शौचाच्या जागेत स्वेदाचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन, भगंदर, थ्रोम्बोज्ड सिस्ट इत्यादी आजार वाढतात.

अशा प्रकारे, स्त्रियांमध्ये शौचाच्या जागेवर फिशर, मुळव्याध, भगंदर किंवा इतर आजार होण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत अधिक असते.

 

सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल

स्त्रियांना शौचाच्या जागी कोणताही प्रकारचा त्रास असेल, वरील लक्षणांपैकी काही लक्षणे आढळून येत असतील तर सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलशी त्वरित संपर्क करा. महिला रुग्णांसाठी महिला  डॉक्टर उपलब्ध.

Contact : 9673507355 / 9325223647

पत्ता : सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल, पीव्हीआर टॉकीज व औरंगाबाद जिमखाना क्लब समोर, सिडको एन -2, मुकुंदवाडी ,जालना रोड छत्रपती संभाजीनगर 43001.

Web:  https://shivkumarrgorey.in/susshrut-hospital/ 

Insta: https://www.instagram.com/sushrut_hospital_official/

Facebook: https://www.facebook.com/SusshrutHospitalOfficial/

Youtube: https://www.youtube.com/channel/UCN-lniBi7cMp6cj2038rs2A

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these